पतीसह आठ जणांविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा
माहेराहून दहा लाख रुपये आणावेत म्हणून गरोदर विवाहितेचा छळ करुन तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आला आहे .
मिताली उर्फ मोनाली साईनाथ खैरनार (रा. धोंदलगाव ) असे पीडित तक्रारदार महिलेचे नाव आहे. साईनाथ दिलीप खैरनार (पती), दिलीप सखाराम खैरनार (सासरे), आशाबाई दिलीप खैरनार (सासू) , मंगलबाई साहेबराव खैरनार (मोठी सासू), स्वाती गणेश शिरोळे (नणंद रा. कोपरगाव), गणेश मच्छिंद्र शिरोळे (नदोंई), गुरुनाथ दिलीप खैरनार (दीर, रा. शिर्डी), सुरेश नामदेव शिंदे (मामे सासरा, रा. विंचुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिताली हिचे २०२० मध्ये शिर्डी येथे प्रसादालय जवळ राहत असलेल्या साईनाथ खैरनार याच्याशी लग्न झाले होते. साईनाथ खैरनार हा दारु पिऊन घरी यायचा, मित्रांसोबत पार्ट्या करायचा व मिताली हीस शिवीगाळ व मारहाण करत होता. तसेच सासरची मंडळीही मिताली हिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.
कच्चा माल आणण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आण, नाहीतर आम्ही तुला नांदवणार नाही. असे म्हणून सासरच्यांनी मितालीस पाच महिन्यांची गर्भवती असतांना २७ फेब्रुवारी २०२१ मध्ये घराबाहेर काढले. तेव्हापासून अडिच वर्षांच्या मुलासह माहेरी धोंदलगाव येथे राहत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जीवन पाटील करीत आहेत.