Ration Shop | महिला बचतगटाला स्वस्तधान्य दुकान

0

तहसीलदारांच्याहस्ते  उद्घाटन 


वैजापूर तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथे सहयोग महिला बचत गटास मंजूर झालेल्या स्वस्तधान्य दुकानाचे उद्घाटन तहसीलदार सुनिल सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार सुनिल सावंत म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे शासनाचे धोरण आहे.त्यानुसार रिक्त असलेल्या ठिकाणी महिला बचत गटांना स्वस्तधान्य दुकान मंजूर करण्यात आले आहे.





 कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे,सरपंच कल्पना तागड,मंजुषा ढाकरे,जयश्री बोरनारे,भारती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचलन ॲड रमेश सावंत यांनी केले.तर आभार काकासाहेब लव्हाळे यांनी मानले.बचत गटाच्या अध्यक्षा शिला वाळुंज व सचिव मंगल लव्हाळे यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 




या कार्यक्रमास तलाठी प्रशांत देवरुपकर,दिलीप राजपूत ,बचत गटाच्या सदस्या रंजना सांबारे,संगीता सावंत, बबन वाळुंज, रावसाहेब सावंत, उत्तम सांळुके, जनार्दन गायकवाड, संतोष गायकवाड,दत्तू गायकवाड,दिलीप बोरनारे, कैलास मते, संतोष कुभांडे, भाऊसाहेब परदेशी,दिलीप राऊत, सोन्याबापू सावंत, बाबासाहेब तागड,शंकर मंडळ, योगेश गायकवाड, संतोष दोडे,प्रमोद गायकवाड आदीसह नागरीकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top