Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

विकसित भारत संकल्प यात्रा जनकल्याणकारी !

 आ. बोरनारे व डॉ. परदेशींचे प्रतिपादन 



देशातील गोरगरीब, दीन, दुबळे, बेघर,आर्थिक दुर्बल,दिव्यांग,मागासवर्गीय यांचा सर्वांगीण विकास हाच देशाचा खरा विकास आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प  यात्रेतील विविध जनकल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून निघालेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही वरदान ठरणार आहे. असे प्रतिपादन आमदार प्रा. रमेश बोरनारे व  भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी केले. 






विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी व नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी आमदार बोरनारे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना(शहरी), पीएम स्वनिधी  योजना, आभा आरोग्य कार्ड  दिव्यांग निधी या योजनांचा लाभ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जास्तीत जास्त गरजुपर्यंत पोहचावा व त्यांचा विकास व्हावा हा या यात्रेचा उद्धेश आहे‌. प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत(राजपूत) यांनी योजनांची सविस्तर माहिती दिली‌. सर्व लाभार्थी व गरजूंना चित्रफितीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली. 


या  विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ तालुक्यातील महालगाव येथून झाला. याप्रसंगी माजी पंचायत. समिती सभापती बाबासाहेब जगताप, भाजप तालुकाध्यक्ष नारायण कवडे, पारस घाटे, वसंत त्रिभुवन, जयमाला वाघ, माधुरी बनकर, सुप्रिया व्यवहारे, डॉ. सविता निकाळे, राहुल साठे,  मयूर मोदानी, सुनील भाग्यवंत, दिवाकर त्रिभुवन, सुर्यकांता काकडे, अनिल पठाण, अमोल निखाडे, महेश गायकवाड, वाल्मिक शेटे,जयपाल राजपूत, विनोद शिनगारे, निर्मला जाधव, मंजिरी खैरे व पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments