२० लाख रुपयांचा खर्च केला निधी
वैजापूर शहरातील रामगिरीनगर परिसरातील नगरपालिकेच्या जागेवर २० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते करण्यात आले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून २०२१-२२ या वर्षात नगरपालिकेच्या हद्दीत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या लोकार्पणप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, संपर्कप्रमुख ॲड. आसाराम रोठे, अविनाश गलांडे, संजय निकम, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, राजेंद्र मगर, दिनकर पवार, प्रशांत शिंदे, ॲड. रमेश पाटील सावंत, विठ्ठल डमाळे, विलास धने यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.