Samruddhi Mahamarg | भीषण: अपघातात चार ठार; मृतांमध्ये चार वर्षीय चिमुकली

0

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण 


 स्कार्पिओ व अर्टिगा कार पाठिमागून धडकल्याने दोन झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चारजण ठार तर चारजण जखमी झल्याची घटना नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर घडली. यातील एका घटनेतील अपघातात एकाच कुटुंबातील तिघा मृतांचा समावेश आहे. ते स्कॉर्पिओने तुळजापूरहून शिर्डीकडे दर्शनासाठी जात असताना अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील सुराळा शिवारात घडली. 







   काव्या कृष्णा लिंगवरम (३२ महिला ), प्रवीणकुमार बोया (४०) श्रीमान प्रवीण लिंगवरम (४ वर्षे मुलगी ) सर्व रा. डोलमंडलम, नादियाल, हैद्राबाद आंध्रप्रदेश व दुसऱ्या अपघातातील आशिष जनार्धन पाटणकार (५५ रा. जुहू , मुंबई) अशी  ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीणकुमार बोया हे कुटुंबातील सदस्यांसह स्कॉर्पिओमधून (ए. पी. - ४० एम ४०५०) तुळजापूरहून शिर्डीकडे साई दर्शनासाठी जात होते. वैजापूर तालुक्यातील सुराळा शिवारात त्यांच्या वाहनाने पाठीमागून एका अज्ञात वाहनाला जोरात धडक दिल्याने प्रवीणकुमार बोया यांच्यासह काव्या कृष्णा लिंगवरम हे दोघेजण जागीच ठार झाले तर श्रीमान प्रवीण लिंगवरम (४) या चिमुकलीसह बोया व्यंकटमाडू (५०), लौक्या लिंगवरम (१२ मुलगी), रोजा रूबानी (४० महिला ) हे सर्वजण गंभीर जखमी झाले. ही घटना  २६ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील वैजापूर सुराळा शिवारात घडली. 






फौजदार प्रवीण पाटील, पोलिस काॅन्स्टेबल संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्वांना रुग्णवाहिकेद्वारे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  यातील काव्या लिंगवरम व प्रवीणकुमार बोया या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र श्रीमान लिंगवरम या चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान २६ जानेवारी रोजी रात्री मृत्यू झाला. जखमींवर वैद्यकीय अधीक्षक डॉ सुधाकर मुंडे, डॉ. दुर्गा पाटील, डॉ. यशपाल चंदे, प्रशांत सोनवणे, जगदीश आहिरे यांनी उपचार केले. दरम्यान या घटनेत स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला आहे. स्कॉर्पिओने कंटेनरला धडक दिल्यानंतर चालक कंटेनरसह पसार झाला असावा. असा पोलिसांचा कयास आहे. 






अर्टिगाची ट्रकला पाठीमागून धडक 



दुसऱ्या एका घटनेत अर्टिगा कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव शिवारात २७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. आशिष जनार्धन पाटणकर (५५ रा.जुहू मुंबई ) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे तर संदीपसिंह गिरीजासिंह (४९ रा.वसई वेस्ट, ठाणे) हे गंभीर जखमी झाले आहे. हे दोघे अर्टिगामधून (एमएच ४६ एआर ९७७५ ) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून मुंबईहून छञपती संभाजीनगरकडे जात असताना ही घटना घडली. या दोन्ही घटनेप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.






वाहने चक्काचूर 



स्कार्पियो वाहनाने पाठिमागून जोराची धडक दिल्याने या घटनेत कारचे मोठे नुकसान होऊन चक्काचूर झाला आहे तर हिच परिस्थिती अर्टिगाची झाली आहे. या दोन्हीही घटनेतील साधर्म्य म्हणजे ही दोन्हीही वाहने पाठिमागून जाऊन धडकली. 



'ती' आठवण अजून ताजीच



दरम्यान बुलढाणा जिल्ह्य़ातील सैलानी बाबांच्या दर्शनाहून नाशिककडे जाणाऱ्या टेंपो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन १३ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच या दोन घटना घडल्या. टेंपो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने ही घटना घडली होती. या घटनेचा ठपका राज्य परिवहन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. १४ आॅक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top