मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर येथील मराठा समाजबांधवांनी वैजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात एकत्र येत महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजीसह गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आमदार रमेश बोरनारे, प्रशांत सदाफळ, संजय निकम, पंकज ठोंबरे, अविनाश गलांडे, मंजाहरी गाढे, लिमेश वाणी, रामकिसन जोरे, शंकर मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.