बाटली : 'त्या' दुकानाच्या स्थलांतरासाठी ४० दिवसांचा अल्टीमेटम् !

0

 ग्रामस्थांचे उपोषण मागे 



वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील बसस्थानकाजवळ असलेले देशी दारूचे दुकान स्थलांतर करण्यात यावे. या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे यांच्यासह गावकऱ्यांनी येथील देशी दारूच्या दुकानासमोर सुरू केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. दरम्यान दुकान स्थलांतरित करण्यासाठी ४० दिवसांचा अल्टीमेटम् देण्यात आला आहे.





    तालुक्यातील  महालगाव येथील बसस्थानकालगतच  गावाचे प्रवेशद्वार असून नेमके याच ठिकाणी देशी दारूचे दुकान आहे. येथे तळीरामांची मोठी गर्दी होते. बसस्थानक जवळच महिला प्रवासी, शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींची सतत वर्दळ असते. परंतु देशी दारू दुकानावर गोळा झालेले तळीराम या परिसरातच लघुशंका करून टवळक्या करत असतात.


 महिला व विद्यार्थ्यीनींसमोर असले लाजिरवाणे प्रकार होत असल्याने त्यांना नाहकच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय या ठिकाणी वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा होत आहे. गावातील प्रवेशद्वारालाच हे देशी दारूचे दुकान असल्याने जणू गावात येणाऱ्याचे हे दुकान स्वागतच करत आहे. या सर्व लाजिरवाण्या प्रकारामुळे सदरील देशी दारूचे दुकान हे इतरत्र हलवावे. असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. 


दरम्यान या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गावकऱ्यांनी देशी दारू दुकानासमोर उपोषण सुरू केले होते. परंतु दुकान हलविण्यासाठी संबंधित मालकाने ४० दिवसांचा अवधी मागवून घेतला. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top