वैजापूर तालुका कृषी विभागाच्यावतीने कापूसवाडगाव येथे डाळींब व मोसंबी या पिकांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात बदनापूर येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांनी शेतकऱ्यांना डाळिंब व मोसंबीच्या लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंतचे मार्गदर्शन केले.
जमिनीची निवड, माती परीक्षण, निरोगी कलमांची निवड, लागवडीच्यावेळी रासायनिक, जैविक व शेणखताचा वापर करून खड्डे भरणे व त्यानंतर निरोगी कलम लागवड करणे, मोसंबी व डाळिंब पिकांवरील विविध किडी व रोग यामध्ये फळमाशी, खोडकिडा, फळ पोखरणारी आळी ,फुल किडे ,पिठ्या ढेकूण, सिट्रस सायला, लाल कोळी तसेच सिट्रसग्रीनिंग, डिंक्यारोग, तेल्यारोग, मररोग, खतव्यवस्थापन ,पाणीव्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकरी संदीप थोरात यांच्या शेतात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पिकांच्या गरजेनुसार आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत देणे तसेच ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर व बागेचे दररोज निरीक्षण करून योग्य रीतीने व्यवस्थापन करून निर्यात क्षम फळे तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी सहायक मीना पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सरपंच नानासाहेब थोरात ,गोरख थोरात ,प्रमोद थोरात, सुनील थोरात ,अशोक थोरात ,ज्ञानदेव थोरात ,गणपत थोरात ,राहुल थोरात ,संदीप कदम ,दत्ता धामणे, राजेंद्र गिरी ,मयूर खरमाळे ,शिवाजी निगळ ,दिलीप रायते ,अजय साळुंखे ,योगेश थोरात ,आदित्य थोरात ,मंगेश रोहम ,राजेंद्र निगळ, सचिन थोरात ,दत्तू थोरात, रूपाली थोरात ,ज्योती थोरात आदींसह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते