सटाणा येथे १५० क्विंटल मका जाळली

0


एकाविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा 


शेतात पोळ घालून ठेवलेली दीडशे क्विंटल  मका जाळल्याची घटना  तालुक्यातील सटाणा येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा येथील  संतोष राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 



  प्रशांत बोरनारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, त्यांनी सटाणा शिवारातील गट क्रमांक १५२ मध्ये खरीप हंगामात घेतलेल्या मका पिकाचे कणसं पोळ घालून ठेवले होते. त्यांच्या शेतात एक वर्षांपूर्वी संतोष राजपूत हा शेती कामाला होता. 

परंतु त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी त्याने 'मी तुमच्या शेतीचे नुकसान करुन टाकेन, तुमची मका जाळून टाकेन' अशी धमकी दिली होती. मंगळवारी सायंकाळी शेतातील कणसांची पोळ सुस्थितीत होती. परंतु बुधवारी सकाळी पाच वाजता शेतात जाऊन बघितले असता मकाचे कणसं जळताना दिसले.

 विलास त्रिभुवन, कैलास त्रिभुवन व अन्य शेतकऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली. मात्र या घटनेत १५० क्विंटल एक लाख रुपये किमतीच्या मका पिकाचे नुकसान झाले आहे. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन संतोष राजपूत याच्याविरुद्व वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असुन अधिक तपास हवालदार अविनाश भास्कर करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top