वैजापूर येथील सेंट मोनिका इंग्लिश विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थीनी श्रद्धा सचिन साळुंके हिने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळा ते सेंट मोनिका इंग्लिश स्कूल या दोन किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदकाची मानकरी ठरली.
माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, प्राचार्य किशोर साळुंके व स्वाती खैरनार, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्याहस्ते पदक प्रदान करण्यात आले.