वैजापूर शहरासह तालुक्यात भारतीय प्रजासत्ताक दिन (Indian Republic Day ) विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात डॉ. अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते तर तहसील कार्यालयात तहसीलदार सुनील सावंत, नगरपालिकेत मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर मुंडे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजारोहणाचा प्रमुख कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. येथे राष्ट्रगान घेण्यात आले. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी मानवंदना दिली. यानंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली.
याप्रसंगी तहसीलदार सुनील सावंत, पालिका प्रशासक भागवत बिघोत राजपूत, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, शाळेचे मुख्याध्यापक एस.के.पगार, अशोक पवार, तलाठी गजानन जाधव, रय्यस चाऊस, मनीष गणवीर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.