दोन जगार अड्ड्यांवर छापा
वैजापूर शहरात भरवसाहतीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सहायक पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून तीन लाख ४३ हजारांच्या मुद्देमालासह ३२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने ही जंबो कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक महिती अशी की, शहरातील स्वस्तिक टॉवर व हळदी गल्ली या वसाहतीत अवैध जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता ३२ जुगारी जुगार खेळताना मिळून आले. पथकाने त्यांच्यासह जुगाराचे साहित्य, मोटारसायकल, मोबाईल,संगणक व रोख रक्कम असा एकूण तीन लाख ४३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.