Fraud | शहरातील 'तो' डाॅक्टर भोंदूबाबाच्या गळाला..! लालसेपोटी मित्राकडून लाखो घेतले अन् बुवाने बुडविले; प्रकरण पोहोचले पोलिस ठाण्यात

0

दामदुपटीची लालसा पडली महागात 


 मित्राकडून बांधकामाच्या बहाण्याने ३० लाख रुपये उसने घेऊन परत न करणाऱ्या शहरातील एका डॉक्टराविरुद्ध ( Doctor) वैजापूर पोलिस ठाण्यात ( Vaijapur Police station) तक्रार देण्यात आली आहे. संबंधित डॉक्टराने ही रक्कम एका भोंदूबाबाकडे दुप्पट करण्यासाठी दिल्याचा खळबळजनक आरोप घटनेतील तक्रारकर्त्यांने केला आहे. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डाॅक्टरने केलेल्या या खटाटोपाची शहरात खुमासदार चर्चा सुरू झाली आहे.


                        याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका सर्जन डॉक्टराने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील त्याच्या एका मित्राकडून सन २०२२ मध्ये ३० लाख रुपये उसने घेतले होते. पैसे घेताना ही रक्कम आपण बांधकामासाठी उसने घेत असल्याचा खुलासा करून त्यांनी ही रक्कम घेतली होती. ही रक्कम आपण सहा महिन्यात परत करू. या बोलीवर या डॉक्टराने उसनी घेतली होती. यानंतर घेतलेल्या रकमेपैकी ५ लाख रुपये त्या डॉक्टराने मित्राला परत केले. परंतु उर्वरित रक्कम परत देण्याबाबत डॉक्टर त्याच्या मित्राला उडवाउडवीची उत्तर देऊन आज देतो, उद्या देतो असे म्हणून थापा मारू लागला. अखेर मित्राचा वारंवार तगाद्यामुळे डॉक्टरने 'तुम्ही दिलेले पैसे हे आपण बांधकामासाठी न वापरता एका भोंदूबाबाकडे दुप्पट करण्याच्या बोलीवर गुंतवलेले आहे. 


याशिवाय माझी बायको गर्भवती आहे. तिचा गर्भ बदलण्यासाठी देखील मला पैसे हवे होते म्हणून हे पैसे मी तुमच्याकडून घेतले होते. बाबाने पैसे दिल्यावर मी तुम्हाला पैसे देतो' असा खुलासा केला. यानंतर १ ऑगस्ट २०२२ रोजी डॉक्टर व त्याचा मित्र हे दोघेही त्या भोंदूबाबाकडे गेले. परंतु तुम्ही डॉक्टरला पैसे उसने दिलेले असून तुमचा माझा काही एक संबंध नाही. असे त्याने सांगितले. या सर्व घटनाक्रमानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्याने त्याने वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला आहे. 


 दोन वर्षांनंतर उचलले 'कदम'

दरम्यान घटनेतील तक्रारदाराला तब्बल दोन वर्षांनंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजले व त्यामुळे हा सर्व प्रकार  समोर आला. अखेर त्याने वैजापूर पोलिसांत संबंधित डॉक्टराविरुद्ध तक्रार अर्ज देण्यासाठी 'कदम'  ( पाऊल ) उचलले आहे. भोंदूगिरीचा 'नि' वैद्यकीय व्यवसायाचा दूरपर्यंत कुठलाही संबंध नसतो. भोंदूगिरीचा लव'लेश' नसतांना हा डाॅक्टर या चक्करमध्ये पडलाचा कसा? अशी खुमासदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.


डाॅक्टर बुवाच्या गळाला कसा?

 प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार अगदीच सरळ वाटत असला तरी घटनेतील भोंदूबाबा कोण ?  विज्ञान युगात देखील वैद्यकीय व्यवसायातील नामंकीत डाॅक्टर बाबाबुवांच्या गळाला लागतोच कसा ? हे या घटनेच्या पार्श्वभूमीवर न उलगडणारे कोडे आहे. 


 दावा दिवाणी स्वरूपाचा !

दरम्यान या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदरील दावा हा दिवाणी स्वरूपाचा असून संबंधित तक्रारदारास तसे  समजावून सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }