वैजापूरची 'नारंगी' होणार प्रदूषणमुक्त

1 minute read
0

by satyarthi group,


वैजापूर | शहरातील नागरी भागातील सांडपाण्याचा गटाराद्वारे नारंगी नदीपात्रात सांडपाण्याची विल्हेवाट लावून नदीपात्र दूषित व दुर्गंधयुक्त करण्याच्या पध्दतीला आता वैजापूर नगरपालिका प्रशासनाने पूर्ण विराम देऊन नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. 




पवई येथील आय. आय. टी. संस्थेच्या मदतीने नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रालगत ४५ लाख लिटर क्षमतेच्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. नागरी भागातील दररोज ५० लाख लिटर सांडपाणी साठा या ठिकाणी संकलित करुन त्यापैकी ९० टक्के जलसाठा  पुनर्वापरासाठी शुद्ध केला जाणार आहे.


४५ लाखांच्या प्रकल्पाचे काम पूर्ण ; सांडपाण्याची लागणार विल्हेवाट 


या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे नदीपात्रात दररोज वाहून जाणारे सांडपाणी दुर्गंधीचे नकारात्मक चित्र नाहीसे होणार आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून २०१८ या वर्षात माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी यांच्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने शहरातील गावठाण परिसरात ५१ किलोमीटर लांबीची भूमिगत ड्रेनेज लाईन, ४५ लाख लिटर व २५ लाख लिटर क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कामासाठी ४६ कोटी २८ लक्ष रुपयांचा आर्थिक निधी मंजूर केला होता.


या निधीतून पहिल्या टप्प्यात ड्रेनेज लाईन व नारंगी नदीकाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. ड्रेनेज लाईनद्वारे नागरी भागातील सर्व सांडपाणी या प्रक्रिया केंद्रात साठवण केले जाईल. पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा पुर्नवापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरपलिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.


देखभाल दुरुस्ती खर्च 'शून्य'


वैजापूर नगरपालिकेचा 4.5 एमएलडी क्षमतेचा एसबीटी(soil biotechnology)तंत्रज्ञान आधारित,STP प्लांट पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये आयटी मुंबई यांचे तंत्रज्ञानावर आधारित टिटवाळ्यानंतर, वैजापूर येथे हा प्लांट उभारण्यात आला आहे, याचे वैशिष्ट्ये म्हणजे याला शून्य देखभाल दुरुस्ती खर्च आहे. 


 शुद्ध होणारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे दोन दशलक्ष लिटर, पाण्याची मागणी समृद्धीवरील झाड जगवण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यातून नगरपालिकेला कायमचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल तसेच ही योजना पुढे चालवण्यासाठी मोठी मदत होईल. 


- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }